“राज कुंद्रा काय दहशतवादी आहे का?”; जामीन नाकारताच कोर्टात विचारणा
पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राला कनिष्ठ न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.
तर अश्लील चित्रपट निर्मितीत तरुणींना बळजबरीने आणले जात होते. त्यामुळे कुंद्राला जामीन दिल्यास या तरुणींवर पुन्हा दबाव टाकून तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. तसंच कुंद्राला जामीन न देण्याची विनंती केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर पोलिसांचे म्हणणे मान्य केले व जामीन देण्यास नकार दिला.
दरम्यान, कुंद्राने अटकेबाबत उच्च न्यायालयात याचिका केली असून त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. राज कुंद्राने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत आपली अटक बेकायदेशीर असून तात्काळ सुटका केली जावी अशी मागणी केली आहे.
अश्लील चित्रफितींच्या प्रकरणात आणखी एक गुन्हा
अश्लील चित्रफितींच्या प्रकरणात एका नवोदित अभिनेत्रीच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वेबसीरिजच्या नावाखाली अश्लील चित्रफितींचे चित्रण करून ते प्रसारित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
आरोपींनी मढ बेटावरील आणि लोणावळ्यातील बंगल्यात अभिनेत्रीला चित्रीकरण करण्यास भाग पाडले.हॉटशॉट, न्यूफ्लिक्स आणि गुपचूप अॅपसाठी तिच्याकडून ५ चित्रफितींचे चित्रण करून घेण्यात आले. अभिनेत्रीचा चेहरा न झाकताच तिच्या पूर्वपरवानगीविनाच या चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या.

कोई टिप्पणी नहीं