Breaking News

गोडी गुलाबीतील मैत्री लॉजपर्यंत पोहचली, अन् महिला फसली!

 

The sweet pink friendship reached the lodge, and the woman fell!

पुणे : खासगी कार्यालयातील महिलेशी ओळख वाढवून एकाने महिलेस लॉजवर नेले. तेथे महिलेस नवीन साडी देऊन साडी परिधान करताना तिचे छायाचित्रे काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (man Taking abuse photo and Blackmail women case Pune Bandgarden Police Station)

याप्रकरणी येरवडा येथील 49 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन कदम नावाच्या व्यक्तीविरुद्ध (पूर्ण नाव मिळालेले नाही) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत महिला एका खासगी कार्यालयात नोकरीला आहे. तेथे कदम नावाचा व्यक्‍ती साहेबांना भेटायला आला होता. तेव्हा महिलेने त्यास साहेब कोरोनामुळे भेटू शकणार नाहीत, असे सांगितले.

त्यावेळी आरोपीने तिच्याशी गोड बोलून तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर पिडीत महिला काम संपवून घरी जात होती. तेव्हा महिलेस जबरदस्तीने त्याच्या गाडीत बसविले. त्यानंतर महिलेला पुणे स्टेशन येथील एका लॉजमध्ये नेऊन तिला जबरदस्तीने पैसे देऊ केले. मात्र महिलेने पैसे घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने आणलेली नवीन साडी महिलेस परिधान करण्यासाठी दिली.

तसेच महिला साडी परिधान करीत असतानाच तिचे छायाचित्र मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर त्याने महिलेस सर्व कपडे काढण्यास सांगितले. तेव्हा महिलेने त्यास विरोध दर्शविला. त्यानंतर त्याने काढलेली छायाचित्रे सगळीकडे व्हायरल करण्याची महिलेस धमकी दिली. या घटनेनंतर महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली.


कोई टिप्पणी नहीं