कंपनीत सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेऊन केला 17 वर्षीय मेहुणीवर अत्याचार
तिसगाव परिसरातील लॉज वरील घटना
वाळुज येथील कंपनीत नोकरीत असलेल्या अल्पवयीन मेहुणीला नोकरीच्या ठिकाणी सोडतो असे सांगून बहिणीच्या नवऱ्याने मोटरसायकलवर सोबत घेतले. वाळूजकडे जात असतानाच तिसगाव परिसरातील एका लॉजमध्ये मेहुणीला नेत अत्याचार केल्याची घटना २९ जुलै रोजी घडली आहे.
या प्रकरणी सख्या दाजीवर पोस्को कायद्यातंर्गत बलात्काराचा गुन्हा हर्सुल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
मुलीकडे मोबाईल नसल्यामुळे चालत एका चौकात आली. त्याठिकाणाहुन एका व्यक्तीच्या मोबाईलवरून दाजीला घरी सोडण्याची विनंती केली. मात्र त्याने सोडण्यासाठी येण्यास नकार दिला. यानंतर पिडित मुलगी एका व्यक्तीच्या सोबतच घरी परतली. त्यानंतर घडलेला वृत्तांत घरी सांगितल्यानंतर हर्सुल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार आरोपीवर पोस्को कायद्यातंर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला हर्सुल पोलिसांनी तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले असता 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याप्रकारणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुलकुमार ठोकळ करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं